Friday, December 25, 2009

साठ वर्षांची म्हातारी

एक साठ वर्षांची म्हातारी बाई रस्त्याने चालली असताना तिला एक आवाज ऐकूं आला ‘‘तू अंैशी वर्षांपर्यंत जगशील.’’ तिने आजूबाजूला पाहिले, पण तिला कुणी दिसले नाही. तो नक्की देवाचाच आवाज होता असे तिला वाटले. म्हणून ती प्लॅस्टिक सर्जनकडे गेली.

तिने नखशिखांत सौंदर्योपचार करुन घेतले. आता ती पुढची वीस वर्षें छानच दिसली असती. ती डॉक्टरांच्या क्लिनिकमधून बाहेर पडली आणि तिला एका बसने धडक दिली. ती मरण पावली आणि स्वर्गांत गेली.

ती देवाला म्हणाली, ‘‘तू मला सांगितलंस कीं मी 80 वर्षांची होईपर्यंत जगेन. मला आणखी वीस वर्षें आयुष्य मिळणार होते. मग त्या बसला तू मला मारुं कसं दिलंस?

देव म्हणाला, ‘‘मी तुला ओळखलंच नाही.’’

No comments:

Post a Comment