Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : Tower

गगनराव ठेंगणे, मुंबई. वरळी येथील टी.व्ही. टॉवरची उंची दरवर्षी एक सेंटिमीटरने वाढत असल्याची अफवा गेले काही दिवस पसरली आहे. ती नितांत खोटी असल्याचे दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी एका खुलाशात सांगितले आहे. नरेंद्र दाभोळकर यांच्या उपस्थितीत या टॉवरची उंची टेपने मोजण्यात आली व तो टॉवर उभा केला तेव्हा होता तितकाच असल्याचेही निदर्शनास आल्याचे समजते. लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये आणि टॉवरची पूजा करण्यास गर्दी करू नये, असे आवाहनही सह्याद्री वाहिनीवरून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment