Tuesday, December 8, 2009

Best Marathi Joke : Farmer

एक शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर बसून, कशाची तरी वाट बघत होता. जवळच्या पायवाटेनं जाणाऱ्या एका शहरी माणसानं त्याला विचारलं, "काय शेतकरीदादा? कसला विचार चालला आहे? एखाद्या अडचणीत आहात का तुम्ही?"
यावर किंचित्‌ हसून तो शेतकरी म्हणाला, "छे छे! उलट देवदयेनं माझ्या अडचणी आपोआप एकामागून एक सुटत असल्याने मी समाधानी आहे. गेल्याच आठवड्यात मला या माझ्या शेताच्या आसपासची झाडं कोळसा बनविण्यासाठी तोडायची होती. पण त्याच वेळी एकाएकी भलं मोठं वादळ आलं आणि ती सगळी झाडं मुळापासून उन्मळून पडली ! ती झाडं तोडण्याचे माझे श्रम अनायासे वाचले.
शहरी माणूस - अरे वाः! मोठे नशीबवान दिसता तुम्ही. मग त्या झाडांचे कोळसे केलेत का?
शेतकरी - तेही श्रम मला घ्यावे लागले नाहीत. परवा नेमकी त्याच झाडांवर वीज कोसळली आणि त्या सर्व झाडांचे परस्पर झक्कास कोळसे बनून गेले!
शहरी माणूस - मग मात्र कमालच झाली म्हणायची ! बरं आता तुम्ही कशाची वाट बघत बसला आहात?
शेतकरी - वादळ व वीज यांनी जशी माझी दोन मोठी कामं केली, तसाच जर आता जोरदार धरणीकंप झाला, तर माझ्या शेतजमिनीत तयार झालेले बटाटे, त्या जमिनीला भेगा पडून तिच्यातून आपसूक बाहेर पडतील व माझे जमीन खणण्याचे श्रम वाचतील तेव्हा आता मी अशा धरणीकंपाची वाट बघत बसलो आहे.

No comments:

Post a Comment