Saturday, December 5, 2009

काहीतरीच भाग १

प्रश्न  :   यक्षप्र्ना बायकोने विचारलेल्या प्र्नाापेक्षा मोठा असू शकतो का?
उत्तर :   मुळात बायको हाच मोठा यक्षप्र्ना असतो!  


प्रश्न    :  काय काका, बऱ्याच दिवसांत फिरकला नाहीत?
उत्तर  : तुमच्याकडे मागे आलो होतो तेव्हा सकाळच्या दुधवाल्यापासूनचे पैसे मलाच द्यायला लागले होते.



बायका खोटं बोलत आहेत, हे कसे ओळखावे?
उत्तर  :  तुमच्या बायकोबद्दल मी काय सांगणार!


तुमचा वाढदिवस कधी असतो?
उत्तर  :  तुम्ही प्रेझेंट किती पर्यंत देणार आहात ते सांगा, नाहीतर सांगून काय फायदा?


प्रेम म्हणजे काय?
उत्तर  :  तुमच्या बजेटच्या बाहेरचं काम आहे ते.


आपलीच माणसे आपल्याला धोका देऊ लागली तर काय?
उत्तर  :  तुम्ही काय केलंत, ते मात्र तुम्ही लपवून ठेवता.


२०१२ साली जगबुडी झाली तर काय करायचं?
उत्तर  :  आमच्या घरात सर्वाना पोहता येते. तुमचं माहीत  नाही.


तुमच्या मिशांमध्ये मुंग्या घुसल्या तर काय कराल?
उत्तर  :  तुम्ही कधीपासून पेस्ट कंट्रोलच्या धंद्यात शिरलात?



प्रत्येक ठिकाणी मराठी शब्द वापरला पाहिजे, हा अट्टाहास कितपत योग्य?
उत्तर  :  ज्या गोष्टी आपल्या मूळच्या मराठी आहेत त्यासाठी मराठीचा हट्ट धरणे योग्य. इंग्लिश लोक कधीही खलबत्त्याला इंग्रजीत काय म्हणायचं, यावर चर्चा करीत नाहीत.

No comments:

Post a Comment