बोलणारा(उघड):साहेब देव्याच्या कृपेने एकदाचा माजी मुलगी पास झाली .
ऎकणारा(मनात):(मग काय पेढे वाटू?)
बोलणारा(उघड):साहेब आज मी नवीन मोटर सायकल विकत घेतली
ऎकणारा(मनात):(बाकीचे काय फुकट घेतात की काय गाड़ी ?)
बोलणारा(उघड):साहेब 10 वर्षे झाली, आता तरी माझं प्रमोशन करा की?
ऎकणारा(मनात):(अरे तुझं प्रमोशन म्हणजे माझी जागा आहे। ती तुला कशी देऊ? बावळट कुठला ....)
बोलणारा(उघड):साहेब बढती मिळाली, उद्या पार्टी ठेवली आहे.
ऎकणारा(मनात):(साहेबसमोर एवढे दिवस चमचेगिरी केली त्याचा फायदा झाला म्हणायचा.)
बोलणारा(उघड):ही माझी बायको, पूजा ......
ऎकणारा(मनात):(ह्या माकडाला मस्त चिकनी बायको मिळाली. मजा आहे माकडाची .)
बोलणारा(उघड):हे फोटोंचे अल्बम पाहात बसा.
ऎकणारा(मनात):(आग लावा त्या अल्बम्सना, वैताग साला.)
बोलणारा(उघड):साहेब मला उद्या सुटी मिळेल का?
ऎकणारा(मनात):(अरे ? उद्या तर मला तुझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जायचे होते.)
No comments:
Post a Comment